Vishrantwadi Pune Crime News | पुणे: अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ज्येष्ठाला लुबाडले

Senior Citizen

पुणे: Vishrantwadi Pune Crime News | अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) करुन त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठाची गेल्या दीड वर्षांपासून छळवणुक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) एका तरुणाला अटक केली आहे. (Vishrantwadi Pune Crime News)

प्रिन्स प्रेमकुमार सिंग Prince Premkumar Singh (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका ५७ वर्षाच्या नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स याने फिर्यादी यांना भरपूर दारु पाजली. दारुच्या नशेत फिर्यादी झोपेत असताना त्यांचे कपडे काढून त्यांच्यावर अत्याचार केला. त्या अवस्थेतील अश्लिल फोटो काढले. हे अश्लिल फोटो, नातेवाईक, गल्लीतील लोकांना दाखवण्याची व चाकूने जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या नावार मोटारसायकल व मोबाईल घेतला. वारंवार २ हजार, ५ हजार रुपये असे करुन जवळपास २० ते २५ हजार रुपये घेतले.

३१ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रिन्स हा फिर्यादीच्या घरी आला. चाकूचा धाक दाखवून तुम मेरेको अभी
के अभी ५ हजार रुपये दो, वरना मै तुमको और तुम्हारे घर वालोंको मार डालुंगा,
और तुम्हारे फोटो भी सब तुम्हारे रिश्तेदारों को दिखावुंगा असे म्हणून जीवे मारण्याची धमकी
देऊन ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed