Voter ID-Pune News | जुने एमटी सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या मतदारांना नोंदणीचे आवाहन

Voter ID

पुणे : Voter ID-Pune News | | जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला आहे. बाहेरील जिल्ह्यातील जुने एमटी सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी काही मतदारांकडे एमटी सिरीजमधील जुने कृष्णधवल मतदार ओळखपत्र आढळून आले होते. या ओळ्खपत्राचा पुरावा म्हणून वापर करीत त्यांना मतदान करायचे होते. ते इतर जिल्ह्यातील असल्याने आणि पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अशा मतदारांनी मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज सादर करावा आणि जिल्ह्यातील संबंधित मतदारसंघात नोंदणी करावी.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे.

पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदीसारखे कार्यक्रम राबविले जातील. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाईन नावनोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in
या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्जाची प्रत मतदार नोंदणी अधिकारी किंवा तहसील कार्यालयात सादर करता येईल.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा.
तसेच मतदार नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed