Wagholi Pune Accident News | वाघोलीतील अपघातप्रकरणी डंपरमालकाला अटक; चालकाला दारुचे व्यसन असल्याचे माहिती असूनही दिला डंपर चालविण्यास
पुणे : Wagholi Pune Accident News | डंपर दुर्घटनेतील डंपर चालक याला दारुचे व्यसन असल्याची माहिती असतानाही त्याला डंपर चालविणार देणार्या डंपरमालकाला पोलिसांनी अटक केली आहे,
अनिल काटे (वय ३९, रा. दापोडी) असे डंपरमालकाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यु झाला असून ६ जण जखमी झाले होते.
अनिल काटे याला डंपरचालक गजानन शंकर तोटरे (वय २६, रा. केसनंद) याला दारु पिण्याचे व्यसन आहे हे माहिती होते. जेव्हा डंपरचालक डंपर घेऊन चालला होता. तेव्हा काटे याला त्याबाबत माहिती होती. रविवारी रात्री तो दारु पिला होता की नव्हता, याबद्दल माहिती नसल्याचे काटे याने पोलिसांना सांगितले. मालकाने त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्यप्राशन करुन गाडी चालवायची नाही, हे वारंवार सांगणे अपेक्षित होते. त्यामुळे पोलिसांनी डंपरमालकाला अटक केली आहे.
केसनंद फाटा येथे मजुरांना चिरडण्यापूर्वी या डंपरने वाघोलीतील बायफ रोडवरील ग्राहक सेवा केंद्राच्या शटरला धडक दिल्याचे आढळून आले आहे.
त्यात केंद्रचालकाचे संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीनचे व भिंतीचे नुकसान झाले आहे.
धडक दिल्यानंतर डंपरचालक गजानन तोटरे याने तेथील चहा विक्रेत्याची वाद घातला होता.
त्यानंतर तोटरे याने डंपर भरधाव घेऊन काही अंतरावरील फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडले होते. (Wagholi Pune Accident News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Goyal Properties Pune | राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचा गोयल प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीला दणका,
घर खरेदीदारांना दोन महिन्यात रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश
Shivaji Road Pune Accident News | मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक;
लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात (Video)