Wagholi Pune Crime News | मुलाच्या हव्यासासाठी विवाहितेचा छळ करुन आत्महत्येस केले प्रवृत्त; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल, वाघोलीतील घटना
पुणे : Wagholi Pune Crime News | घराण्याला वारस हवा, या हट्ट्यापायी दोन मुलीवर तिसरे अपत्य मुलगा हवा, यासाठी विवाहितेचा शारीरीक मानसिक छळ केला गेला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Married Woman Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिवानी स्वप्नील पात्रे (वय २४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत शिवानीचे वडिल विलास गोंविद बालवडे (वय ५२, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती स्वप्नील संतोष पात्रे (वय २८), सासू आशा संतोष पात्रे (वय ४४), मावस सासू नंदा (वय ५०, सर्व रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी ३ ऑगस्ट रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शिवानी हिचा विवाह स्वप्नील पात्रे याच्याशी झाला होता. त्यांना दोन्ही मुली झाल्या. त्यावर पती स्वप्नील, सासू आशा व शेजारी राहणारी मावस सासू नंदा यांनी तुला दोन्हीही मुली झालेल्या असून आम्हास वारस म्हणून तिसरे अपत्य मुलगा हवा आहे.
त्यासाठी तू तिसरे अपत्य मुलगा होऊ दे, अन्यथा आम्ही स्वप्नीलचे दुसरे लग्न लावून देऊ,
असे म्हणून शिवानी हिचा वेळोवेळी शारीरीक, मानसिक छळ करुन शिवीगाळ, मारहाण करत होते़. या छळाला कंटाळून शिवानी हिने आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?