Wagholi Pune Crime News | पुणे: दारू पिताना वडिलांना टकल्या बोलला म्हणून राग अनावर झाल्याने छातीवर दगड मरुन एकाचा खुन; वाघोलीमधील घटना

पुणे : Wagholi Pune Crime News | दारू पिताना वडिलांना टकल्या बोलला म्हणून राग अनावर झाल्याने एका अल्पवयीन मुलाने ४६ वर्षाच्या मजुराच्या छातीवर दगड मारुन त्याचा खुन केला. राजू लोहार (वय ४६, रा. दरेकर वस्ती, लोहगाव, वाघोली रोड) असे खुन झालेल्या मजुराचे नाव आहे. वाघोली पोलिसांनी (Wagholi Police) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Wagholi Murder Case)
वानवडी, सिंहगड रोड येथे दोघा अल्पवयीन मुलांचे नुकतेच खून झाले होते तर आता अल्पवयीन मुलाने एकाचा खुन केल्याची घटना घडली आहे.
याबाबत राज राजू लोहार (वय २८, रा. दरेकर वस्ती, लोहगाव वाघोली रोड, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना लोहगाव वाघोली रोडवरील रोहन अभिलाषा सोसायटी जवळील भूषण धूत यांच्या प्लॉटमध्ये बुधवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू लोहार हे मजुरी काम करत होते. भूषण धूत यांच्या प्लॉटमध्ये दारु पिऊन त्यांचे एका अल्पवयीन मुलाबरोबर किरकोळ वाद झाला. या वादाच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने राजू लोहार यांच्या छातीवर दगड मारुन त्यांचा खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. वाघोली पोलीस तपास करीत आहेत. (Wagholi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी