Wakad Pune Crime News | लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्‍या महिलेचा खुन करुन मृतदेह टाकला खंबाटकी घाटात; तक्रार देणार्‍या प्रियकराने केली हत्या, तीन वर्षाच्या मुलालाही सोडून दिले आळंदीला

Murder Case

पुणे / पिंपरी : Wakad Pune Crime News | लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live In Relationship) राहणार्‍या महिलेचा खून (Murder Case) करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) टाकून दिले. इकडे वाकड पोलिसांकडे मिसिंगची तक्रार देणार्‍या प्रियकराने हा खुन केल्याचे वाकड पोलिसांनी (Wakad Police) उघडकीस आणले. प्रेयसी सतत पैशांची मागणी करत तसेच तिच्या चारित्रयाच्या संशयावरुन त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याने तीन वर्षाच्या मुलालाही आळंदी येथे सोडून दिले होते.

जयश्री विनय मोरे (वय २७, रा. अ‍ॅड्रेस टॉवर, मारुंजी, हिंजवडी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दिनेश पोपट ठोंबरे Dinesh Popat Thombre (वय ३२, रा. बहुर पो़ करुंज, ता़ मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री मोरे या लग्नांनंतर पतीबरोबर रहात होती. तर हिंजवडीतील कंपनीत सुपरवायझर असलेल्या दिनेशचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. पाच वर्षांपूर्वी दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे़ दरम्यान, जयश्रीकडे आणखी एक मोबाईल असून तो नेहमी सायलेंटवर असल्याचे दिनेशला समजले. त्या मोबाईलबाबत विचारल्यावर दोघांमध्ये वाद झाला. जयश्री हिचे दुसर्‍या तरुणाशी संबंध असल्याचा दिनेशला संशय होता. त्यातून २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता भुमकर चौकातील जिंजर हॉटेल जवळ त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा दिनेश याने गाडीतून हातोडा बाहेर काढून जयश्रीच्या डोक्यात मारुन तिचा खुन केला.

त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन तो कारने खांबाटकी घाटात गेला. तेथे मृतदेह टाकून पुन्हा पुण्यात परत आला. हिंजवडी पोलिसांकडे जाऊन आपली पत्नी मिसिंग असल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला काही प्रश्न विचारल्याने तेथून तो बाहेर आला आणि ३ वर्षाच्या मुलाला त्याने आळंदी येथे सोडून दिले. वाकड पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीच्या मिसिंगची तक्रार नोंदविली. आळंदी पोलिसांना मुलगा मिळाल्याने त्यांनी त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल केले. त्याचवेळी खांबाटकी घाटात सापडलेल्या महिलेचा फोटो वाकडमधील जयश्री मोरे या मिसिंग महिलेशी जुळत असल्याचे दिसून आले. आळंदी येथे सापडलेला मुलगा दिनेश याचा असला तरी तो कागदोपत्री मुलाचा पिता नसल्याने पोलिसांनी त्याचा ताबा दिनेशकडे दिला नाही. त्याचवेळी खांबाटकी घाटातील मृतदेहाची ओळख पटल्याने वाकड पोलिसांनी आळंदीहून दिनेशला बोलावून घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महानवर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस उपनिरीक्षक भारत माने, बिभिषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार चंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतरे, कोतेंय खराडे यांनी केली आहे. (Wakad Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत