Wakad Pune Crime News | चिखल उडाल्याने टेम्पोचालकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : Wakad Pune Crime News | टेम्पोने चिखल उडाल्याचे कारण सांगून दोघांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत विशाल नथु गायकवाड (वय ३०, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Attempt To Murder)
त्यावरुन पोलिसांनी किशोर पांचाळ (वय २०, रा. रहाटणी) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार करण ऊर्फ मुन्ना गजानन चोपवाड (वय २४, रा. रहाटणी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रहाटणी येथील शिवराजनगरमधील लेन नंबर १ मध्ये शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे वर्कशॉपसमोर टेम्पो पार्क केला. त्यांच्या शॉपचे शेजारील शॉपमध्ये कामास असलेले कामगार महादेव मुरीअप्पा येतिमणी व लिंगा शिवाप्पा कटमणी यांच्याबरोबर बोलत थांबले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीचे किशोर पांचाळ, करण चोपवाड तेथे आले. त्यांच्याजवळ येऊन “आमच्या अंगावर चिखल का उडवला,” असे विचारले. फिर्यादीचे काहीही ऐकून न घेता़ करण याने फिर्यादीस “तुला लय माज आला आहे का, तुला आज संपवूनच टाकतो,” असे म्हणून कमरेचा कोयता काढला.
फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर वार केला. तो त्यांनी चुकविला.
परंतु, त्यांच्या खांद्यावर पाठीमागील बाजूला हा वार लागून ते गंभीर जखमी झाले.
किशोर पांचाळ याने लोखंडी रॉडने फिर्यादीचे डोक्यात मारत असताना त्यांनी हात
मध्ये केल्याने उजव्या बोटावर मारुन त्यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करीत आहेत. (Wakad Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा