Wakad Pune Crime News | पुणे : दुचाकीच्या डिक्कीमध्ये गांजा ठेवून महिला करत होती विक्री; वाकडमधील कारवाईत लाखांचा गांजा जप्त

woman-arrested

पुणे / पिंपरी : Wakad Pune Crime News | दुचाकीच्या डिक्कीमध्ये अंमली पदार्थ ठेवून विक्री करीत असलेल्या महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडले. (Ganja Case)

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नारायण जाधव (PSI Narayan Jadhav) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गीता मुकेश यादव (वय ३४, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) हिला अटक केली आहे. ही घटना म्हातोबानगर झोपडपट्टीत डांगे चौक ते दत्त मंदिर रोड दरम्यान सुमन शिंदे यांच्या बंद पानटपरीजवळ सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली. (Woman Arrested In Ganja Selling Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक व वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक पायी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक महिला रोडच्या कडेला थांबून गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक परफेक्ट बेकर्स अँड स्वीटसमोर पोहचले. तेथे एक महिला होंडा अ‍ॅक्टीव्हा स्टँडवर लावून संशयास्पदरित्या थांबली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. तिच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ९८ हजार ८०० रुपयांचा १९७६ ग्रॅम गांजा आणि १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव (PSI Atul Jadhav) तपास करीत आहेत. (Wakad Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन