Wakad Pune Crime News | पुणे : मोबाइलच्या हट्टापायी विवाहितेने संपवल जीवन; वाकडमधील घटना
पुणे :Wakad Pune Crime News | सध्या लहानांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. या व्यसनाने आत्तापर्यंत अनेकांचे जीव ही घेतले आहेत. अशीच एक घटना बुधवारी संध्याकाळी वाकड येथे घडली. नवऱ्याने मोबाइलचा हट्ट न पुरवल्यामुळे पत्नीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली. (Woman Suicide Case)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शिवानी गोपाल शर्मा (वय- २० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. शिवानी पती गोपालसोबत वाकड येथे राहत होत्या. गोपाल हे एका खासगी कंपनीत काम करतात. ते कामावर गेल्यानंतर शिवानी ह्या एकटयाच घरी असायच्या. त्यामुळे त्यागेल्या काही महिन्यांपासून गोपाल यांच्याकडे मोबाईलचा हट्ट करत होत्या. पंरतू पैशाच्या अडचणीमुळे ते मोबाईल घेऊ शकत नव्हते. तरीही ते मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होते. (Wakad Police Station)
अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी शिवानी यांनी घरात एकट्या असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपाल जेव्हा नोकरीवरून घरी परत आला. तेव्हा पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टा पायी शिवानीने गळफास घेतल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा