Wakad Pune Crime News | बनावट मृत्युपत्राद्वारे जमीन लाटली ! विकसनासाठी दिली पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाकडे, महिला वकिलाच्या फिर्यादीवरून दिलीप कलाटे, नंदकुमार कलाटे, संभाजी कदम, प्रदिप निम्हण, नंदकुमार कोकाटे, पांडुरंग पारखे आणि डॉ. तुषार चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे / पिंपरी : Wakad Pune Crime News | बनावट मृत्युपत्राद्वारे (Forged Wills) सर्व जमीन लाटली. त्यानंतर ती जमीन विकसनासाठी पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाकडे देऊन त्यातून लाखो रुपये मिळविल्याचा आरोप एका महिला वकिलांनी केला आहे. वाकड पोलिसांनी बनावट मृत्युपत्रप्रकरणी डॉक्टरांसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दिलीप सोपान कलाटे Dilip Sopan Kalate (रा. ननावरे वस्ती, बाणेर), नंदकुमार सोपान कलाटे Nandkumar Sopan Kalate (रा. प्रभात रोड), संभाजी सूर्यकांत कदम Sambhaji Suryakant Kadam (रा. पाषाण), प्रदिप प्रभाकर निम्हण Pradeep Prabhakar Nimhan (रा. पाषाण), नंदकुमार शंकर कोकाटे Nandkumar Shankar Kokate (रा. पाषाण), पांडुरंग हरीभाऊ पारखे Pandurang Haribhau Parkhe (रा. पाषाण) आणि डॉ. तुषार चौधरी (Dr. Tushar Chaudhary) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Cheating Fraud Case)
याबाबत अॅड. पुजा मारुती कलाटे (वय ३६, रा. वाकड) यांनी वाकड पोलिसांकडे (Wakad Police) फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे वाकड येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांचे वडिल मारुती सोपान कलाटे यांचे ३ जून १९९९ रोजी निधन झाले. वडिलांच्या मृत्युनंतर आर्थिक लाभापोटी त्यांचे दोन्ही चुलते दिलीप सोपान कलाटे व नंदकुमार सोपान कलाटे आणि इतरांनी तुषार चौधरी, प्रदिप प्रभाकर निम्हण, नंदकुमार शंकर कोकाटे, संभाजी सूर्यकांत कदम, पांडुरंग हरीभाऊ पारखे यांनी संगनमत करुन कट कारस्थान रचून त्यांचे आजोबा सोपान नाथू कलाटे व आजी भागुबाई सोपान कलाटे याच्या नावाने बोगस व बनावट मृत्युपत्र/ इच्छापत्र अस्तित्वात आणून त्याद्वारे ही मिळकत त्यांच्या दोन्ही चुलत्यांनी निम्मी निम्मी वाटून घेतली.
या मिळकतीपैकी सं. नं. १८६ एकूण क्षेत्रफळ १०१ आर जमीन लगेच बांधकाम व्यावसायिक संजय काकडे (Builder Sanjay Kakade) व इतर यांना विकसन कुलमुख्यत्यारपत्र व विकसन करारनामाद्वारे दुय्यम निबंधक हवेली १५ येथे रजिस्टर करुन हस्तांतरीत करुन त्यातून स्वत: करीता लाखो रुपयांचा फायदा करुन घेतला आहे, असा आरोप फिर्यादीत केला आहे.
या दोन्ही मृत्युपत्राला ज्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावलेले आहे. त्या डॉक्टरची मेडिकल कौन्सिलच्या वेबसाईट तपासली असता त्यावर डॉ. तुषार चौधरी याचे नावाची नोंद आढळून न आल्याने तो बनावट असल्याचे फिर्यादी यांची खात्री झाली आहे. तसेच डॉ. तुषार चौधरी यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवरील डिग्री तपासली असता बी ए एम अॅन्ड एस व एम बी बी एस असा उल्लेख आहे. त्याचा रजिस्टर परवाना नं. आय ८५० असा लिहिलेला आहे. डॉ. तुषार चौधरी याच्याकडे कुठलीही पदवी व परवाना नसतानाही त्याने स्वत: डॉक्टर असल्याचे भासवून तसे तंदुरुस्ती प्रमाणपत्र देऊन ते तथाकथीत मृत्युपत्राला लावून फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार (API Arjun Pawar) तपास करीत आहेत. (Wakad Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या
Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त
Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”