Wanwadi Pune Crime News | बँक लिलावातील फ्लॅट देण्याच्या नावाखाली महिला इस्टेट एजंटने घातला गंडा
पुणे : Wanwadi Pune Crime News | विधवा असल्याची सहानभुती मिळवून बँक लिलावातील फ्लॅट स्वस्तात देण्याच्या नावाखाली महिला इस्टेट एजंटने व्यावसायिकाला २६ लाख रुपयांना गंडा घातला (Cheating Fraud Case). पैसे मागितल्यावर गुंडांच्या नावाने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीची पोलिसांनीही दखल न घेतल्याने शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला आहे. परंतु, आर्थिक गुन्हा असतानाही त्याचा तपास पोलीस हवालदारांकडे सोपविला आहे.
याबाबत शिवराज हैदर रशीर अली रिजवी (वय ४४, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निगार मलिक शेख व तिची मुलगी आलिशा शेख (रा. ब्राम्हा आंगण सोसायटी, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून त्यांच्या दुकानात निगार शेख या खरेदीसाठी येत असल्याने ओळख होती. त्या रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याचे सांगत. त्यांनी एका बँकेने लिलावात फ्लॅट काढला असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना तो फ्लॅट आवडल्याने त्यांनी खरेदी करायची तयारी दर्शविली. शेख यांनी तो ५० लाख रुपयांना असल्याचे सांगितले. त्यानुसार कागदपत्र बनविण्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपये घेतले. वेळोवेळी त्या रोख व चेक द्वारे पैसे घेत होत्या. १५ लाख रुपये रोख घेतल्यानंतर त्यांनी त्याची केवळ १० लाख ४२ हजार रुपयांची पावती दाखविली.
उरलेले पैसे तिने परत केल्यावर फिर्यादी यांनी २४ लाख २ हजारांचा चेक दिला. ५० लाख रुपये दिल्यानंतरही फ्लॅटचे खरेदीखत करण्यास टाळाटाळ करु लागली. काही महिन्यांनी तिने सांगितले की, फ्लॅट मालकाने कर्ज भरल्याने बँक आता लिलाव करणार नाही, असे सांगितले. तेव्हा त्यांनी पैसे परत मागितल्यावर तिने केवळ २४ लाख २ हजार रुपये परत केले. फिर्यादी यांनी उरलेले २५ लाख ९८ हजार रुपयांची वारंवार मागणी केल्यानंतरही तिने परत केले नाही.
कोंढव येथील गुंडांची नावे सांगून पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
याची त्यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली परंतु,
त्यांची कोणीही दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार दत्तात्रय बोबडे यांच्याकडे तपास दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा