Wanwadi Pune Crime News | पुणे: ‘त्याने’ गुन्हेगारी वृत्ती दाखवून दिली ! तरुणीला संबंध तोड सांगितल्याने गुंडाची तरुणाला मारहाण

Marhan

पुणे: Wanwadi Pune Crime News | तरुणाने आपल्या नातेवाईक असलेल्या तरुणीला तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे, त्याच्याशा बोलू नको, असे सांगितल्याने त्या तरुणीने बोलणे बंद केले. त्याने खरोखरच आपण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने दाखवून देत तरुणावर हत्याराने वार करुन जबर जखमी केले (Attack On Youth). त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या या तरुणीला व तिच्या बहिणीला मारहाण केली. (Wanwadi Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DBJf47OJhAk

लखन बाळु मोहिते (वय २१, रा. भिमनगर झोपडी संघ, आवटे वस्ती, वैदुवाडी, हडपसर) याच्यावर वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिषेक सतीश सोनवणे (वय २५, रा. भिमनगर झोपडी संघ, वैदुवाडी, हडपसर – Hadapsar) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

https://www.instagram.com/p/DBLOtbICtvz

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीची बहिणीची गल्लीतील लखन मोहिते याच्याशी ओळख झाली. ते एकमेकांना मोबाईलवर चॅटींग करुन बोलत होते. हे फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी लखन मोहिते हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने त्याच्याशी बोलू नको, अशी समज दिली. त्यामुळे तिने लखन मोहिते याच्याशी बोलणे बंद केले. त्याचा आरोपीला राग आला.

१४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी हे रामटेकडी येथील विराज चायनीज
समोरुन रोडवरुन जात होते. त्यावेळी लखन याने टोकदार हत्याराने फिर्यादी यांच्या पाठीवर
व पोटावर मारुन जखमी केले. वाईट शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
हा प्रकार पाहून फिर्यादी यांची वहिनी व तिची बहिण फिर्यादी यांना सोडविण्यासाठी मध्ये
आल्या असताना आरोपीने त्यांनाही हाताने मारहाण केली. पोलीस अंमलदार राऊत तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DBLLMeAiR2P

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supreme Court Notice To Mahayuti Govt | ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या
मोफतच्या योजना म्हणजे लाच’, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस

Police Inspector Suspended In Pune | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षक तडकाफडकी निलंबित, जणून घ्या प्रकरण

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘लाडकी बहीण’ वरून शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…’

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

You may have missed