Wanwadi Pune Police Action | हातभट्टीची दारु विकणार्‍यावर कारवाई ! हडपसरमधील गोसावी वस्तीत ४५ हजारांची दारु पकडली

Wanwadi Police

पुणे : Wanwadi Pune Police Action | रमजान सणानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीवरुन वानवडी पोलिसांनी गोसावी वस्तीत छापा टाकून ४५ हजार रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

सोमनाथ संजय कांबळे (वय ३०, रा. बिराजदारनगर, हडपसर) असे या दारु विक्रेत्याचे नाव आहे. तो ३५ लिटरच्या १२ कॅनमध्ये ही दारु भरुन विक्री करत होता.

रमजान सणानिमित्त सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाण्यातील सुरक्षानगर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बंदोबस्त करत असताना पोलीस हवालदार रुपाली ताकवले यांना माहिती मिळाली की, गोसावी वस्ती येथे एक जण तयार हातभट्टीची दारु विक्री करत आहेत. या बातमीनुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता छापा टाकून सोमनाथ कांबळे याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या नायलॉनच्या पोत्यात गावठी हातभट्टीची दारु मिळून आली. पत्र्याच्या शेडच्या मागील बाजूला पाहणी केल्यावर बेटशिटच्या खाली ३५ लिटर च्या १२ कॅनमध्ये दारु भरलेली आढळून आली. पोलिसांनी ही ४५ हजार ३५० रुपयांची दारु जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे, पोलीस हवालदार रुपाली ताकवले, पोलीस अंमलदार मंगल पारधी, सोनपसारे, महेश माने यांनी केली आहे.

You may have missed