Warje Malwadi Pune Crime News | पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्यास गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू ; पुण्यातील वारजे परिसरातील घटना
पुणे : Warje Malwadi Pune Crime News | पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्याचा मोह न आवरल्याने १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून साकारण्यात आलेल्या वारजेतील रामनगर-गणपती माथा टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. दक्ष सुशांत कांबळे (वय-१३, रा-रामनगर, वैदूवाडी, वारजे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील रामनगर टेकडी परिसरालगत नागरी वन उद्यान असून, या उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये सुट्टीच्या दिवशी गुरुवारी (दि.१५) दुपारी साधारण तेरा ते चौदा वर्षांची चार मुले पोहायला गेली होती. त्यातील मृत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला. त्या सोबतची तिन्ही मुले घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहिती घरी दिली नाही.
मात्र, सायंकाळपर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना मिळताच वारजे पोलिस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले. (Warje Malwadi Pune Crime News)
अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोध कार्य केले.
त्यानंतरही मृतदेह सापडला नाही.
त्यानंतर पोलिसांनी आणलेल्या एका व्यक्तीने रात्री सव्वाबाराच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधला.
त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय येथे पाठविण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य