Warje Malwadi Pune Crime News | 13 वर्षापूर्वी ऊरुसात झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी तरुणावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : Warje Malwadi Pune Crime News | शेजारी राहणार्या दोन कुटुंबात अहिरे गावाच्या ऊरुसात १३ वर्षापूर्वी भांडणे झाली होती. त्यानंतर अधूनमधून किरकोळ भांडणे होत होती. या भांडणातून शेजारी राहणार्यांनी तरुणावर लोखंडी धारदार हत्याराने वार (Koyta Attack) करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). नागेश आनंदा वांजळे (वय ३४, रा. देवगिरी कॉलनी, न्यू अहिरेगाव, वारजे माळवाडी) हा जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
याबाबत त्याची आई कमल आनंदा वांजळे (वय ५८, रा. देवगिरी कॉलनी, न्यु अहिरेगाव) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चांगदेव ऊर्फ पप्पु अशोक वांजळे (वय ३७, रा. देवगिरी कॉलनी, न्यू अहिरेगाव, वारजे माळवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार देवगिरी कॉलनीत १९ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. चांगदेव वांजळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्याचा २०२२ मध्ये गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. चांगदेव वांजळे याच्याबरोबर १३ वर्षापूर्वी आहिरे गावातील उरुसात भांडणे झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नाही. त्यानंतर त्यांच्यात अधून मधून किरकोळ भांडणे झाली होती.
फिर्यादी यांचा मुलगा नागेश वांजळे हा १९ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घराशेजारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने ते पहायला गेला होता. तो खाली येऊन थांबला होता. तेव्हा पप्पू वांजळे, त्याची आई, पत्नी हे घराबाहेर रोडवर येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. त्यानंतर पप्पू वांजळे हा लोखंडी धारदार शस्त्र घेऊन आला. त्यावेळी पप्पू वांजळे याच्या पत्नीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा पप्पू याने पत्नीच्या कानाखाली मारुन तो नागेश वांजळेकडे गेला.
त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने नागेशवर लोखंडी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले.
शेजारी असलेल्या नातेवाईकांनी नागेश याला रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
पोलिसांनी चांगदेव ऊर्फ पप्पू वांजळे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे (Sunil Jagdale) तपास करीत आहेत. (Warje Malwadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)
Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न