Warje Malwadi Pune Crime News | पुणे : नामांकित शाळेतील 10 व 11 वर्षांच्या मुलांवर 39 वर्षाच्या डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार
पुणे : Warje Malwadi Pune Crime News | शाळेतील अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणार्या एका डान्स टिचरला (Dance Teacher) वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) अटक केली आहे.
वारजे परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये ९ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. शाळेतील डान्स टिचरने ११ व १० वर्षांच्या मुलांवर लैंगिक अत्याचार केला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा शिक्षक त्रास देत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्यांने केली आहे. ३९ वर्षाचा हा डान्स टिचर गेली दोन वर्षांपासून या शाळेमध्ये शिकवत होता. (Dance Teacher Arrested In POCSO Act)
या घटनेत वारजे माळवाडी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना पुढे आल्याने संबंधित शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे शाळेने काल रात्री सर्व पालकांना मेसेज पाठवून आज शाळा बंद राहणार असल्याची सूचना दिली. दरम्यान, अनेक पालक शाळेबाहेर जमले आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam DCP) यांनी सांगितले की,
या घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जेव्हा हा प्रकार समोर आला, त्यानंतर शाळेच्या प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली.
या डान्स टिचरला निलंबित करण्यात आले असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या डान्स टिचरला अटक केली आहे. (Warje Malwadi Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन