Warje Malwadi Pune Crime News | तडीपार गुंडाला वारजे पोलिसांनी केले अटक ! ओळखू नये, म्हणून लावला तोंडाला मास्क

Arrest

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार केले असताना शहरात येऊन कोणी ओळखू नये म्हणून तोंडाला मास्क लावून बसलेल्या तडीपार गुंडाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. (Tadipar Criminal Arrest)

अक्षय शांताराम सावंत Akshay Shantaram Sawant (वय ३०, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रदिप विजय शेलार यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याददिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सावंत याला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केले होते. या तडीपारीचा भंग करुन तो घरी आला होता. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस शिपाई पवार, भुरुक, दराडे, सुतकर यांच्याबरोबर फिर्यादी कर्वेनगर भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की, तडीपार गंड त्याच्या कर्वेनगर येथील घरी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी कर्वेनगर येथे गेले. तेव्हा तो पार्किंगमध्ये तोंडाला मास्क लावून बसला होता. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. (Warje Malwadi Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed