Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण

marhan

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | दहीहंडीचे (Dahi Handi 2024) डेकोरेशनचे काम पूर्ण करुन घरी जात असलेल्या दोघा भावांना कार नीट चालवता येत नाही का असे म्हणून तिघांना लाकडी बांबुने बेदम मारहाण केली (Marhan). त्यात तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या कानातील नस तुटल्याने रक्तस्त्राव होत आहे. तसेच त्यांच्या भावाचा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे.

याबाबत निलेश बाळासाहेब वांजळे (वय ३०, रा. कर्वेनगर) यांनी हॉस्पिटलमधून वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडे (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. वारजे चौकाकडून कर्वेनगरकडे (Warje Chowk To Karve Nagar Road) जाणार्‍या रोडवर बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डेकोरेशनचा व्यवसाय करतात. दहीहंडीचे डेकोरेशनचे काम पूर्ण करुन तो आपला भाऊ जयदीप कदम (वय २८) यांच्याबरोबर कारने घरी चालले होते. त्यावेळी वारजे चौकाकडून कर्वेनगरकडे जात असताना आंबेडकर चौकाच्या सर्कलजवळ कर्वेनगर चौकाकडून आलेल्या रिल्वर रंगाच्या गाडीने वेगाने येऊन सर्कलजवळ थांबली. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या गाडीचा ब्रेक मारला व त्या गाडीकडे पाहू लागले. तेव्हा गाडीतून एक जण खाली उतरला व म्हणाला की, ”काय रे तुला गाडी जमत नाही का” असे म्हणून तो शिवीगाळ करु लागला.

ते खाली उतरल्यावर त्यांच्यातील एकाने लाकडी बांबुने जयदिपच्या हातावर मारहाण केली. तेव्हा तो पळून गेला. लाकडी बांबु घेतलेल्याने फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या कानावर, पाठीवर, उजव्या डोळ्यावर मारहाण केली. तेव्हा त्यांच्या तावडीतून सुटून ते लपून बसले. ते निघून गेल्यावर मित्रांना, नातेवाईकांना बोलावले. त्यांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
फिर्यादींच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या कानातील नस तुटल्याने रक्तस्त्राव होत आहे.
तसेच त्यांच्या भावाचा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
वारजे पोलीस तपास करीत आहेत. (Warje Malwadi Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना