Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Khadakwasla Dam

पुणे : Water Storage In Pune Dam | मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातील चार धरणांमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. पुण्यातील चारही धरणे मिळून ८६.५१ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. (Pune Rains)

गेल्या वर्षी याच काळात ७४.१७ इतका पाणीसाठा होता. त्यामुळे यावेळी चांगल्या पावसाचा परिणाम धरण क्षेत्रातील साठ्यावर झाला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २५.२२ टीएमसी पाणी जमा झाले आहे. पुण्याला प्रमुख चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यात खडकवासला (khadakwasla Dam), पानशेत (Panshet Dam), वरसगाव (Varasgaon Dam) आणि टेमघर (Temghar Dam) या धरणांचा समावेश होतो. (Pune Flood)

मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता २२८८० क्यूसेक्सने करण्यात येणार आहे. नदी पात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुठा नदीमध्ये (Mutha River) मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. पुणेकरांना काही दिवस मनस्तापाला सामोरे जावं लागलं होतं.

गेल्या काही दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. आजपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

पुणे धरणातील पाणीसाठा

खडकवासला: ८६.२४ टक्के

पानशेतः ९४.९९ टक्के

वरसगावः ८१.४६ टक्के

टेमघर: ८०.०३ टक्के

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”

Puja Khedkar Case | पूजा खेडकर गायब? पुणे पोलिसांनी 3 वेळा नोटीस बजावून देखील गैरहजर, दिल्ली पोलिसही शोधात

Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक

Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

Hadapsar Pune Crime News | फोन पे अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने 5 लाख 22 हजारांचा गंडा; गुुगलवरुन बँकेचा नंबर शोधणे पडले महागात