Who Will Next CM Of Maharashtra | मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम, दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, भाजपकडून सावध पावलं

eknath shinde-devendra fadnavis

मुंबई: Who Will Next CM Of Maharashtra | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री पदावर शिंदे पक्ष आपला दावा करत असतानाच या शर्यतीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेत्यांनी (BJP Leaders) मात्र कोणतीही घाई न करता सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. (Maharashtra New CM)

सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपचा मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढल्याने हे यश मिळाल्याचा दावा शिवसेना करत आहे.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आक्रमक होत असताना यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठांकडून सावध पावलं टाकली जात असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात तिन्ही पक्षांसोबत दिल्लीतील नेते चर्चा करणार असल्याने कोणी नवा चेहरा दिला जातो का? यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी निवड झाली असली तरी भाजपचा यासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत दिल्लीतील नेत्यांकडून हालचाली होत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय देखील होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed