Wife Beat Husband | पत्नीकडून पतीची धुलाई ! निमित्त झाले मोड आलेले हरबरा खाल्याचे, टेंगुळ आले कपाळाला; काय आहे नेमका प्रकार वाचा सविस्तर
पुणे : Wife Beat Husband | दारु पिऊन आलेल्याचा जाब विचारल्याने पतीला पत्नीची मारहाण, जेवण नीट न बनविल्याने मारहाण अशा बातम्या नेहमीच आपल्या कानावर येत असतात. पती मारहाण करतो, हे समाजाने स्वीकारले आहे. पण, केवळ मोड आलेले हरभरे खाल्याने एका पत्नीने पतीची अशी काही धुलाई केली की प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. (Pune Crime News)
याबाबत अमोल गुलाबराव सोनवणे (वय ४४, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता सोमवार पेठेतील घरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पती व त्यांची पत्नी रात्री घरी होते. त्यावेळी घरात मोड आलेले हरभरे अमोल याने खाल्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. पत्नीने पतीला शिवीगाळ करत तिच्या हातातील लाटण्याने अमोल याच्या डाव्या हाताच्या तळव्यावर मारले. तसेच डोक्यात, पाठीवर मारले. दुसर्या बोटाचे हाताच्या नखांनी चेहर्यावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे, पोटाला वरखडले. त्यावेळी अमोल याने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. तेव्हा तिने मिक्सरचे भांडे उचलून डोक्यात दोन वेळेला मारले. या भांडणात पत्नीने त्याची पॅन्ट खाली ओढल्याने ते खाली बसले. स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी दोन्ही हात वर केले. तेव्हा पत्नीने हाताची करंगळीला जोरात चावा घेतला. त्यात त्यांचे नख तुटले. समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार परिट तपास करीत आहेत. (Wife Beat Husband)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी