Woman Vandalises Devendra Fadnavis’s Office | महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात घुसून केली तोडफोड; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर (Video)
पुणे.न्युज – Woman Vandalises Devendra Fadnavis’s Office | अज्ञात महिलेने ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनात घुसून तोडफोड करत गोंधळ घातला. धक्कादायक म्हणजे ही महिला पास न घेताच मंत्रालयात गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
https://www.instagram.com/reel/DAakqy-pzoW/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सायंकाळी मुंबईत पाऊस सुरू असल्याने मंत्रालयातील कर्मचार्यांची घरी जाण्याची घाई सुरू होती. अगदी याच मोक्याच्या वेळी सचिवांसाठी असलेल्या गेटमधून एक महिला मंत्रालयात घुसली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर फडणवीसांचे कार्यालय आहे. तेथे जाऊन महिलेने कार्यालयाची पाटी काढून फेकून दिली. तसेच तिथे आरडाओरडा करत कुंड्या देखील फेकण्यास सुरूवात केली. अधिक गोंधळ होताच महिला तेथून पळून गेली. ती महिला कोण होती, आत कशी आणि कशासाठी आली होती, इतका गोंधळ घालून ती लगेच कशी पसार झाली याचा तपास आता पोलीस करत आहेत.
https://www.instagram.com/p/DAahR6gttQh
या खळबळजनक घटनेने मंत्रालयाच्या सुरक्षेची लख्तरे वेशीवर टांगली आहेत. एक अज्ञात महिला उपमुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचून बिनधास्तपणे तोडफोड, गोंधळ करून बाहेर कशी काय पडू शकते हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
https://www.instagram.com/p/DAaawvhi31f
अशी घडली घटना
गुरूवारी सायंकाळी संबंधित महिलेने पोलिसांना मंत्रालयात कामसाठी आले होते आणि पर्स आतच विसरले असं खोटं सांगितलं. त्यानंतर ती फडणवीस यांच्या कार्यालयात पोहचली. तिने तिथल्या कुंड्या फेकल्या. गोंधळ घातला. फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली. काही कर्मचार्यांनी तिला समजावण्यचा प्रयत्न केला परंतू ती कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. उलट तिने त़्यांनाच अरेरावी केली. ही सगळी घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याचे कळतयं. घटनेच्यावेळी मंत्रालयात एक ही महिला पोलीस कर्मचारी नसल्याने संबंधित महिलेला पकडता आले नाही. असं पोलिसांकडून सांगण्यात आलयं.
https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’