Yashashree Shinde Murder Case | दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या का केली? कारण आलं समोर; जाणून घ्या

Yashshree Shinde Murder Case

मुंबई : Yashashree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख (Dawood Shaikh Uran) याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे. दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या केली. त्याआधी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. दाऊद शेख हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने यशश्रीचा मृतदेह ठेचला, तसंच प्रायव्हेट पार्टही कापले. या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर या हत्येच्या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. २५ जुलैला यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री त्या मुलीचं प्रेत आम्हाला सापडलं. त्यानंतर शनिवारी म्हणजे २७ जुलैला खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला. या आरोपीला शोधण्यासाठी त्याचा मित्रपरिवार, स्थानिकांची मदत घेतली.

त्याआधारे आमचा तीन-चार जणांवर संशय होता. त्याआधारे आमचा तपास सुरु होता. पोलिसांची पथके नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये होती. दोन पोलीस पथके कर्नाटकमध्ये तळ ठोकून होती. आम्ही त्यांना इकडून इनपुट्स देत होतो. त्याआधारे आम्ही आज सकाळी मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतले.

दाऊद शेख हा अनेक दिवस उरणला वास्तव्य करत होता. त्याच्यावर पॉक्सो प्रकरणात आरोप झाले आणि त्याला तुरुंगात जावं लागलं, ज्यानंतर त्याने उरण सोडलं. करोना काळाच्या दरम्यान दाऊद शेख कर्नाटकमध्ये वास्तव्य करत होता आणि तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने एक दोन कंपन्यांमधली नोकरी बदलली होती. या दरम्यान यशश्री शिंदेच्या तो संपर्कात होता,अशी माहिती आहे.

शेख आणि यशश्री शिंदे यांचे प्रेमसंबंध होते. यशश्री शाळेत असल्यापासून दाऊदला ओळखत होती. दाऊदने यशश्रीला लग्नाची मागणी घातली होती. तसंच लग्न करून बंगळूरला जाऊ असेही तो तिला म्हणत होता. मात्र यशश्रीने नकार दिला. २५ जुलैला तो यशश्रीला भेटायला आला होता. दोघांमध्ये भांडण झालं त्या भांडणातून दाऊदने तिची हत्या केली अशी माहिती समोर आली आहे.

दाऊद शेखवर हत्या आणि ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याने यशश्रीला मारण्यापूर्वी शिवीगाळ केली होती.
दाऊद शेखला अटक करण्यात आल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले.
कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दाऊद शेखला अटक करण्यात आली.
दाऊद शेखने गुन्हा कबूल केला. यशश्रीने लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या केल्याचं दाऊद शेखने म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार

You may have missed