Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
मुंबई: Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख (Dawood Shaikh Uran) याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचने (Mumbai Crime Branch) कर्नाटकातील गुलबर्गा (Gulbarga, Karnataka) येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. या दोघांना लवकरच मुंबईत आणले जाणार आहे.
नवी मुंबईतील उरण परिसरात यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती (Navi Mumbai Murder Case). उरण-पनवेल महामार्गालगत (Uran Panvel Highway) तिचा मृतदेह आढळून आला होता. आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे तिच्या शरीरावर वार केले होते. यशश्रीची हत्या दाऊद शेख यानेच केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. (Uran Murder Case)
मात्र हत्येनंतर आरोपी दाऊद शेख फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण यंत्रणाच कामाला लावली होती. परंतु आरोपी हा वारंवार आपलं लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या चार दिवसांपासून आरोपी सातत्याने आपली ठिकाणे बदलत होता.
अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमध्ये पकडलं आहे. त्याच्यासोबत पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला देखील ताब्यात घेतलं आहे. दरम्यान यशश्री शिंदे प्रकरणात एक जुनं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये दाऊद शेख हा यशश्रीचा पाठलाग करीत असताना दिसत आहे.
२५ जुलै रोजी दुपारी २:१४ वाजता यशश्री स्टेशन रोडवरून उरण स्टेशनकडे जात असतानाचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
या व्हिडिओमध्ये साधारण २:२२ वाजता आरोपी दाऊद देखील त्याच मार्गाने यशश्रीच्या पाठीमागे जात असल्याचे दिसत आहे.
हत्येच्या दिवशी दुपारी यशश्रीचा पाठलाग करत असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु