Yavatmal Crime News | सरपंचाकडून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध

Rape-Case

यवतमाळ : Yavatmal Crime News | लग्नाचे आमिष दाखवून गावातील विद्यमान सरपंचानेच घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रमेश राजुदास चव्हाण (वय-३८) असे आरोपी सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सरपंचावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सरपंच फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Rape Case)

अधिक माहितीनुसार, पीडित महिला आर्णी तालुक्याच्या एका गावातील रहिवासी आहे. ही महिला नवऱ्यापासून विभक्त राहत असल्याची माहिती आहे. सरपंचाने महिलेला निराधार महिलेला रेशन कार्ड काढण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर त्यांच्यात हळूहळू जवळीक वाढत गेली. सरपंचाने त्यानंतर तिच्या मुलांचीही जबाबदारी घेतली.

लग्न होईल या आशेने पीडित महिला तब्बल दीड वर्ष सरपंचासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. लग्नाचा तगादा महिलेकडून वाढत गेल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. २३ मार्चला त्याने महिलेला मुंबईला पाठवले. नंतर त्याने लग्नासाठी स्थळ पाहणी करण्यास सुरूवात केली. याची माहिती पीडितेला मिळाली. तिने तातडीने त्याला कॉल केला. त्यावेळी सरपंचाने “लग्न तर सोड, तुझ्यासोबत राहण्याचीही इच्छा नाही आणि जर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तुला जीवे मारेन”, अशी धमकीही दिली.

यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed