Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार
पुणे : Yerawada Pune Crime News | दुचाकी आणि रिक्षा यांच्या झालेल्या अपघातात नुकसान भरपाई देण्याच्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता, लोखंडी रॉडने वार (Koyta Attack) करुन जखमी केले. (Yerawada Pune Crime News)
याबाबत बिलाल महंमद सय्यद (वय २७, रा. गाडीतळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदिल सय्यद, तौफिक शेख, सुफियान शेख, नजमुद्दीन ऊर्फ पप्पू व आसिफ खन (सर्व रा. कामराजनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील कामराजनगर (Kamraj Nagar Yerawada) येथे रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. (Attempt To Kill)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब निसार शेख व आदिल सय्यद यांच्यात गुंजन चौकात दुचाकी व रिक्षामध्ये अपघात झाला होता. या अपघातातील नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करुन आदील सय्यद याने आसिफ शेख याला हाताने मारहाण केली. आसिफ खान याने आसिफच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. तौफिक व सुफियान यांनी कोयत्याने व लोखंडी रॉडने आसिफ शेख याच्या डोक्यात, हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत. (Attempt To Murder)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु