Yerawada Pune Crime News | माथाडी कामगारांच्या नावाने कंपन्यांना धमकावण्याचा प्रयत्न; आमच्या व्हेंडरला काम दिले नाही तर गाड्या फोडण्याची धमकी

Yerwada-Police-Station

पुणे : Yerawada Pune Crime News | माथाडी कामगारांच्या (Mathadi Kamgar) नावाखाली बाहेरुन आलेला माल उतरविण्यासाठी खंडणी मागण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडत होते. आता या गुंडांची मजल त्याच्याही पुढे गेली आहे. आम्ही सांगू त्यांनाच ट्रान्सपोर्टची कामे द्या, नाही दिली तर गाड्या फोडून टाकू अशा धमक्या देण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हर्षल वझे (वय ४५) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव पाचारणे, सोमनाथ पठारे (रा. खराडी) या गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे. वैभव पाचारणे हा सराईत गुंड असून त्यावर यापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची खराडी येथे बारक्लेज ग्लोबल सर्व्हिस सेंटर ही कंपनी आहे. वैभव पाचारणे व सोमनाथ हे कोणतीही परवानगी न घेता विना परवाना कंपनीमध्ये प्रवेश केला. आम्ही स्थानिक आहोत. आमचे व्हेंडर यांना ट्रान्सपोर्टची कामे द्या. आमचे व्हेंडर यांना कामे दिली नाही तर कंपनीच्या गाड्या अडवून फोडून नुकसान करु, अशा धमक्या दिल्या. फिर्यादी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी व्हेंडरला काम मिळाले नाही तर तुला व कंपनीच्या मॅनेजमेंटला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक लिगाडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed