Yerawada Pune Crime News | बेडीतून हात काढून घेऊन मोक्कातील गुंड पसार; येरवड्यातील घटना

Criminal Who Arrested In MCOCA Is Run Away

पुणे : Yerawada Pune Crime News | पोटात दुखत असल्याची तक्रार केल्याने वैद्यकीय तपासणी करुन पुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) घेऊन जात असताना गुंडाने त्रास होत असल्याचा बहाणा करुन पाणी मागितले. तेव्हा गाडी थांबून पाणी आणायला पोलीस गेले असताना गुंडाने बेडीतून हात बाहेर काढून पलायन केले. ही घटना गुंजन चौकात (Gunjan Chowk Pune) सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडली.

निखील मधुकर कांबळे Nikhil Madhukar Kamble (वय २८, रा. प्रज्ञासागर, बौद्ध विहार, लक्ष्मीनगर, येरवडा) असे पळून गेलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार सुशांत राजेंद्र भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonavane) यांच्याकडे तपासाला असलेल्या मोक्का गुन्ह्यात आरोपी निखील कांबळे, सुदेश ऊर्फ बाब्या रुपेश गायकवाड (वय २२, रा. येरवडा) आणि अतिब अखील सय्यद ऊर्फ भांडा (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक केली होती. निखिल कांबळे याने पोटात दुखत असल्याचे गार्ड हवालदार सचिन गवळी यांनी कळविले. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी फिर्यादी, पोलीस अंमलदार घुले, ओंबासे, हवालदार खराडे या पथकाने तिघा आरोपींना लॉकअप मधून सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी काढून ससून हॉस्पिटलला नेले.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी निखील कांबळे याने सांगितले की डाव्या हाताची बेडी खूप जाम झाली आहे. बेडी जरा थोडी लुज करा. तेव्हा पोलिसांनी चावीने त्याच्या हातातील बेडी लुज केली. वैद्यकीय तपासणी झाल्यावर रात्री पावणे दहा वाजता ते तीनही आरोपींना घेऊन येरवडा पोलीस ठाण्याकडे निघाले. फिर्यादी हे गाडी चालवत होते तर ओंबासे त्यांच्या शेजारी बसले होते. मागील शिटवर आरोपीच्या बाजूला घुले बसले होते. गुंजन चौकात गाडी आली असताना निखिल कांबळे हा मोठ मोठ्याने ओरडून मला जास्त त्रास होत आहे.

मला पाणी द्या नाही तर मला काहीतरी होईल असे बोलून गयावया करुन लागला. तेव्हा फिर्यादी यांनी चौकात गाडी थांबवली. ओंबासे पाणी आणण्यासाठी खाली उतरले. तेव्हा कांबळे याने त्याच्या डाव्या हातातील बेडीमधून त्याचा हात अलगद काढून गाडीचा दरवाजा उघडून येरवडा गावठाणच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अंधार व वाहतूक कोंडी यामुळे पोलीस त्याला पकडून शकले नाही. पोलिसांनी तातडीने ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | पुणे: फायनान्स मॅनेजर असलेल्या महिलेच्या घरात शिरुन कॉलेजच्या ट्रस्टींनी दिली धमकी ! ट्रस्टी म्हणाला – ‘आमच्या सांगण्याप्रमाणे काम कर नाही तर परिणाम भोगायला तयार रहा’