Yerawada Pune Crime News | दारुच्या नशेत मुलाने वडिलांना केली मारहाण ! वृद्धाच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव
पुणे : Yerawada Pune Crime News | दारुच्या नशेत मध्यरात्री घरी आलेल्या मुलाने आपल्या वयोवृद्ध वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हातातील मण्याच्या माळेने डोक्यात जोरात मारहाण केल्याने डोक्यात अंतर्गत रक्तत्राव झाल्याचा प्रकार घडला आहे. (Son Beat Father)
याबाबत वाल्मीक दौलत कांबळे (वय ७९, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा निलेश वाल्मीक कांबळे (वय ४२, रा. नागपूर चाळ, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Yerawada Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नात्याने वडिल व मुलगा आहेत. फिर्यादी हे २१ ऑक्टोबर रोजी रात्री घरात झोपलेले होते. त्यांचा मुलगा निलेश हा दारु पिऊन मध्यरात्री साडेबारा वाजता घरी आला. त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करुन फिर्यादीची मुलगी शितल साळवी हिला मारहाण करुन लागला.
त्याच्या आवाजाने फिर्यादी यांना जाग आली. ते झोपेतून उठले असता निलेश याने त्यांना खाली
पाडुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.
त्यांच्या हातातील मण्याच्या माळेने फिर्यादीचे डोक्यात जोरजोराने मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादीचे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा