Yerawada Pune Crime News | मामाच्या नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पुणे : Yerawada Pune Crime News | मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मामाच्या मावस मेव्हणा याने घरात कोणी नसताना जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका १५ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ अंकुश शिंदे Somnath Ankush Shinde (वय २२,रा. सास्तूर, माखणी, उस्मानाबाद) याच्यावर पोक्सो (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे ११ जून २०२४ रोजी दुपारी एक वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मामाकडे आल्या होत्या. घरात कोणी नसताना मामाचा मावस मेव्हणा आरोपी याने पिण्यास पाणी मागितले. तेव्हा ग्लासमध्ये पाणी आणून दिल्यावर त्याने काही कळण्याचे आत तिचे तोंड दाबून तिला बेडरुमकडे घेऊन जाऊ लागला. तेव्हा फिर्यादी त्याच्या हाताला चावली. त्यावर त्याने तिला मारहाण करुन जर तू आरडाओरडा केला मी तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. त्याला घाबरुन फिर्यादी शांत बसल्या. तेव्हा त्याने तिला बेडरुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सहायक पोलीस निरीक्षक देवकर-पाटील तपास करीत आहेत. (Yerawada Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा