Yerawada Pune Crime News | पुणे : जबरी चोरी करणार्‍या आरोपींच्या येरवडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; वाट चुकलेल्या तरुणाला धमकावून सोन्याची चैन नेली होती हिसकावून

Yerawada Police

पुणे : Yerawada Pune Crime News | वाट चुकलेल्या तरुणाला रस्ता दाखविण्याचा बहाणा करुन आड बाजूला नेऊन धमकी देऊन गळ्यातील सोनसाखळी व कानातील बाळी जबरदस्तीने चोरुन नेणार्‍या तिघांना पकडण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. (Arrest In Robbery Case)

आसिफ अजगर शेख (वय ३२), कुलदिपसिंग युवराजसिंग जुनी (वय २३) आणि मख्खनसिंग लाखनसिंग जुनी (वय ३२, सर्व रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Yerawada Police)

याबाबत अमित विकास शिंदे (वय २७, रा. चिंचवड) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १४ जानेवारी रोजी मरकळ येथे गेले होते. तेथे रात्री जेवण करुन पुन्हा चिंचवडला जात असताना रस्ता चुकले व लोणीकंदवरुन १५ जानेवारी रोजी रात्री १ वाजता येरवडा येथील चिमा घाट येथे आले. त्यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला चिंचवडला जाण्यासाठी रोड कोठून आहे, असे विचारले. त्यावेळी रिक्षामध्ये बसलेला एक जण मला त्या दिशेनेनच जायचे आहे, तुम्हाला रस्ता दाखवतो, असे म्हणून तो त्यांच्या मोटारसायकलवर बसला. त्याने संगमवाडीचे थोडे पुढे गेल्यावर गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचवेळी पाठीमागून रिक्षातून दोघे जण आले. त्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील सोन्याची साखळी व कानातील बाळी असा ८५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता.

येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथक या गुन्ह्याचा तपास करीत होते. पोलीस अंमलदार विशाल निलख, अमोल गायकवाड हे पेट्रोलिंग करीत असताना संगमवाडी रोडवरुन रात्रीचे वेळी येणार्‍या लोकांना लुटणारे संशयित संगमवाडीत थांबलेले आहेत, अशी बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे व त्यांचे सहकारी यांनी तेथे जाऊन संशयित तिघांना सापळा रचून पकडले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील चैन व कानातील बाळी जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली. चोरलेली ७५ हजार रुपयांची सोन्याची चैन व १ लाख रुपयांची रिक्षा असा १ लाख ७५ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर, सर्व्हेलन्सचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, भीमराव कांबळे यांनी केली आहे. (Yerawada Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed