Yerawada Pune Crime News | तडीपार गुंड शहरात येऊन करत होता गांजाची विक्री; येरवडा पोलिसांनी केली अटक

पुणे : Yerawada Pune Crime News | तडीपार केले असतानाही शहरात येऊन विक्री करता गांजा बाळणार्या (Ganja Selling Case) गुंडाला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) अटक केली आहे. अथर्व विशाल वाघ (वय २३, रा. सिद्धार्थनगर, मच्छी मार्केटमागे गाडीतळ, येरवडा) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार अनिल नामदेव शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व वाघ याला पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून या वर्षी तडीपार करण्यात आले आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी अथर्व वाघ हा सराईत गुन्हेगार तडीपार असताना शेलार चाळातील घरात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या अनुशंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यात त्याच्याकडे २ हजार ४०० रुपयांचा १३८ ग्रॅम गांजा आढळून आला. विक्री करण्यासाठी त्याने तो बाळगला असल्याने पोलिसांनी त्याच्या वर एन डी पी एस खाली गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक लामखडे तपास करीत आहेत. (Yerawada Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा