Yerawada Pune Crime News | केस मागे घे ! धमकी देऊन तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केले जखमी

koyta

पुणे : Yerawada Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दाखल केलेली केस मागे घे, अशी धमकी देऊन दोघा भावांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जबर जखमी केले. (Yerawada Pune Crime News)

याबाबत आकालसिंग महेलसिंग भादा (वय ३२, रा. बालाजीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंदसिंग रघुवीरसिंग भादा (वय ३०), मेवासिंग रघुवीरसिंग भादा (वय २७, दोघे रा. बालाजीनगर, बाल न्यायालयासमोर, येरवडा) या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी रात्री दहा वाजता फिर्यादीच्या घरी घडला. (Attempt To Murder)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना दोघे भाऊ त्यांच्या घरात शिरले. त्यांनी आमचेवर केलेली केस मागे घे, असे म्हणून फिर्यादींना धमकाविले. त्यांनी केस मागे घेण्यास नकार दिल्यावर त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच पाठीवर मारले आहे.

त्यांना सोडविण्यासाठी त्यांची पत्नी व वहिनी मध्ये आल्या.
त्यांनी या दोन्हींनाही शिवीगाळ करुन मारहाण करुन जखमी केले आहे.
पोलीस हवालदार चलसाणी तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश