Yerawada Pune Crime News | येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दान पेट्या फोडणारी टोळी जेरबंद ! नगरपर्यंत 200 CCTV तपासून चोरटे ताब्यात

Yerawada Police

पुणे : Yerawada Pune Crime News | येरवडा येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरातील (Tarakeshwar Mahadev temple Yerwada Pune) ६ दान पेट्या फोडून २ लाख रुपये चोरुन नेणार्‍या टोळीला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) अटक केली. या गुन्ह्याचा तपास करताना पुणे ते नगर येथील अहिल्यानगरपर्यंतच्या जवळपास २०० सीसीटीव्ही तपासून आरोपी निष्पन्न करण्यात येरवडा पोलिसांना यश आले.

स्वरुप राजेश चोपडे Swaroop Rajesh Chopde (वय २१, रा. मांजरी बुद्रुक, मुळ नागपूर) आणि अर्थ वाटकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची रक्कम तसेच चोरीच मोटारसायकल जप्त केली आहे.

याबाबत सुधीर वसंतराव वांबुरे (वय ६७, रा. शनी मंदिर, येरवडा गाव) यांनी फिर्याद दिली आहे. चोरटे ४ जून २०२४ रोजी पहाटे दीड ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान तारकेश्वर मंदिराचे मुख्य दरवाजाचे लॉक तोडून त्या वाटे मंदिरात शिरले. त्यांनी मंदिरातील स्टिलच्या ६ दानपेट्या फोडून त्यातील जमा असलेली जवळपास २ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली होती. चोरीचा हा मुद्दा या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता.

तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुणे ते अहमदनगर येथील अहिल्यानगरपर्यंत जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा माग काढला. पोलीस हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केले. या आरोपींपैकी स्वरुप चोपडे याला ४ ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्याने त्याने राजन पटेल, अक्षय शाहू, अथर्व वाटकर, अमित शेरीया (सर्व रा. नागपूर) यांच्या साथीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून जप्त केलेली मोटारसायकल ही चंदननगर येथून चोरलेली होती. (Yerawada Pune Crime News)

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar),
हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonawane),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke), छगन कापसे (PI Chhagan Kapse),
पल्लवी मेहेर (PI Pallavi Mehare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील (PSI Swapnil Pail),
हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे,
सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी ही कामगिरी केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed