Yerawada Pune Crime News | सासरी होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ! अन्नात विष कालवून मारण्याचा केला होता दोन वेळा प्रयत्न
पुणे : Yerawada Pune Crime News | माहेराहून पैसे व सोन्याचे दागिने आणण्यासाठी शारीरीक व मानसिक छळ करुन अन्नात विष कालवून मारण्याचा दोन वेळा प्रयत्न करुन विवाहितेला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. (Married Woman Suicide)
गौरी मनोज गायकवाड (वय ३६, रा. अहिल्या सोसायटी, आंबेडकर चौक, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी उज्वला रमेश आडागळे (वय ५३, रा. कमेला कोंढवा) यांनी येरवडा पोलिसांकडे (Yerawada Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती मनोज सुरेश गायकवाड (वय ३७), सासू मंदा सुरेश गायकवाड (वय ५६), नणंद रेखा कांबळे (वय ४५), दीर आकाश सुरेश गायकवाड (वय २६, सर्व रा. अहिल्या सोसायटी, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००९ पासून २० सप्टेबर २०२४ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी गौरी गायकवाड हिला तिचा पती, सासू, नंणद, दीर हे वेळोवेळी घरात लहान सहान गोष्टींवरून घालून पाडून बोलत. जेवणावरुन कुरापती काढत. माहेरी निघून जाण्यास सांगून तिचा शारीरीक व मानसिक छळ केला जात होता. माहेरहून पैसे व सोन्याचे दागिने आणण्यास सांगून तिला काही काम येत नाही, या कारणावरुन वारंवार त्रास देत असत. तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करत असत. तिच्या अन्नात विष कालवून तिला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या जाचाला कंटाळून २० सप्टेबर रोजी गौरी हिने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)