Yerawada Pune Crime News | नागरिकाला पहाटे लुबाडणार्‍या चोरट्याच्या येरवडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

pune-police-arrest

पुणे : Yerawada Pune Crime News | पहाटे पायी जाणार्‍या नागरिकांला लुबाडणारा (Robbery Case) चोरटयांच्या टोळीतील दोघांना येरवडा पोलिसांनी पकडले आहे. हे दोघेही अल्पवयीन असून त्यांच्याकडून पोलिसांनी (Yerawada Police) चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. (Arrest In Robbery Case)

https://www.instagram.com/p/DAVvO-AJRvd

विश्वनाथ नागरे हे ८ सप्टेबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता येरवड्यातील शास्त्रीनगर येथील सह्याद्री हॉस्पिटल समोरुन पायी जात होते. यावेळी मोटारसायकलवरुन तिघे चोरटे आले. त्यांनी नागरे यांना धमकावून त्यांच्याकडील मोबाईल व १७ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते. (Yerawada Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAVtsHWJbT6

या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अनिल शिंदे, प्रशांत कांबळे व स्वप्निल घोलप यांना बातमी मिळाली की या गुन्ह्यातील एक संशयित मांजरी रेल्वे स्टेशनजवळ थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे चौकशीत त्याने इतर तीन साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला १५ हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.

https://www.instagram.com/p/DAVjoDvJdRp

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonvane), वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे (Sr PI Ravindra Sonavane), पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर (PI Pallavi Meher) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके (API Sunil Saluke), हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAVgdsDp4oI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed