Yewalewadi Pune Crime News | काचेच्या कारखान्यात काचेचे स्लाईड अंगावर पडून चार कामगारांचा मृत्यु; येवलेवाडीतील घटनेत दोन कामगार जखमी
पुणे : Yewalewadi Pune Crime News | येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात काचेचे स्लाईड उतरवुन घेत असताना बांधलेला बेल्ट तुटल्याने काचेचे स्लाईड अंगावर पडले. त्यात काचेचे तुकडे अंगात शिरुन ४ कामगारांचा मृत्यु झाला़ अन्य दोन कामगार जखमी झाले.
https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0
पवन रामचंद्र कुमार (वय पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३), अमित शिवशंकर कुमार (वय २७, सर्व रा. येवलेवाडी मूळ- उत्तरप्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. घटनेत मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना येवलेवाडीतील इंडिया ग्लास सोल्युशन या कंपनीत दीड वाजता घडली.
https://www.instagram.com/p/DAf1JaEiv20
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया ग्लास सोल्युशन (India Glass Soluation) ही कंपनी हुसेन तय्यबअली मिठावाला यांच्या मालकीची आहे. या ठिकाणी मोठमोठ्या काचा आणल्या जातात. त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जातात. रविवारी दुपारी काचेचा एक ट्रक कारखान्यात आला होता. या ट्रकमधील काचाचे स्लाईड खाली उतरण्यात येत होते. हे काचेचे स्लाईड उतरवत असताना त्याला बांधलेला बेल्ट अचानक तुटला व आतील सर्व काचा कामगारांच्या अंगात घुसल्या. त्यात चार कामगारांचा मृत्यु झाला. दोघा जणांवर उपचार करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. (Yewalewadi Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DAfkBKHivvM
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)