Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला, शुक्रवार पेठेतील घटना

marhan

पुणे : Shukrawar Peth Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणवारुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) तीन सराईत गुन्हेगारांसह चार जणांवर सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.8) रात्री पावणे दहाच्या सुमारास शुक्रवार पेठेतील एसआरए बिल्डींगच्या पार्किंगमध्ये घडला.

राहुल शाम भरगुडे (रा. एसआरए स्कीम, शुक्रवार पेठ, पुणे), रोहन दत्तु शेंडगे (रा. लोहीयानगर, पुणे), सुमित जाधव (रा. कांबळे गल्ली, महात्मा फुले वाड्याजवळ, पुणे) व त्यांच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352, 115(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राहुल भरगुडे, रोहन शेंडगे, सुमित जाधव हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Police Record) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज चव्हाण हा एसआरए बिल्डींगच्या पार्किंगमध्ये बसला होता. त्यावेळी आरोपी राहुल भरगुडे याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन मनोज याला शिवीगाळ केली. तसेच तुला लय माज आला आहे का, याला चांगला धडा शिकवा असे म्हणाला. आरोपी रोहन याने फिर्य़ादीला गाडीवर बसण्यास सांगितले मात्र त्याने गाडीवर बसण्यास नकार दिला. याचा राग आल्याने फायटरने मनोजच्या तोंडावर मारुन जखमी केले. तसेच धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. मनोज खाली पडल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोपी राहुल भरगुडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक, स्वारगेट,
लष्कर पोलीस ठाण्यात मारहाण, आर्म अॅक्ट सह इतर 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तसेच त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.
याशिवाय त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. (Pune Crime News)

आरोपी रोहन शेंडगे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न,
आर्म अॅक्टचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याला 2022 मध्ये तडीपार करण्यात आले होते.
तर सुमित जाधव याच्यावर खडक आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed