Bhavani Peth Pune Crime News | पुणे: सिगारेटच्या पैशावरुन वाद, ज्येष्ठ दाम्पत्याला रॉडने मारहाण; दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार गजाआड
पुणे : Bhavani Peth Pune Crime News | सिगारेटसाठी दिलेल्या 20 रुपयांवरुन वाद घालून एका ज्येष्ठ नागरिकाला रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). तसेच महिलेला मारहाण करुन गंभीर जखमी केली. त्यानंतर हातातील रॉड हवेत फिरवून ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणून परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या सराईत (Criminal On Police Record) गुन्हेगाराला खडक पोलिसांनी (Khadak Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि.11) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडली.
याबाबत जखमी सलीम अब्दुल कादर शेख (वय-60 रा. नुरानी मस्जिदच्या मागे, गुलटेकडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अयान रिझवान शेख (रा. अंगरशहा ताकिया, भवानी पेठ, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1) 351(2)(3), 324(4) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1), 134 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी अयान शेख पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपीने सिगारेटसाठी दिलेल्या 20 रुपयांवरून फिर्यादी यांच्या सोबत वाद घातला. अयान याने त्याच्या हातातील रॉड सलीम यांच्या डोक्यात मारला. मात्र, त्यांनी वार हुकवल्याने रॉड पायाला लागून खाली पडला. त्यानंतर आरोपीने रॉड उचलून ‘तुला इथेच संपवतो’ असे म्हणून सलीम यांच्या डोक्यात रॉड मारला असता त्यांनी हात मध्ये घातल्याने हाताला गंभीर दुखापत झाली.
आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीला देखील रॉडने मारहाण करुन जखमी केले.
तसेच हातातील रॉड हवेत उचावून मी इथला भाई आहे, माझ्या नादी लागल्यास मारुन टाकेन अशी धमकी
देऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड