Pune Crime News | पुण्यातील नामांकित संस्थेतील महिला डॉक्टरला बदनामीची धमकी, कर्मचाऱ्यावर FIR

koregaon park police station

पुणे : Koregaon Park Pune Crime News | पुण्यातील नामांकीत संशोधन व प्रशिक्षण संस्थेत काम करणाऱ्या एका महिला डॉक्टर यांचा विनयभंग (Molestation Case) करण्याच्या उद्देशाने बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोरेगाव पोलिसांनी (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 13 जून रोजी सायंकाळी साडेपाच आणि 14 जून रोजी सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान संस्थेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व संस्थेत घडला आहे.

याबाबत 43 वर्षीय महिला डॉक्टरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजीव कटके (रा. कोरेगाव पार्क) याच्यावर आयपीसी 509, 506, 500 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एका संस्थेत काम करतात. आरोपी अंत्यविधीसाठी गेले होते त्यावेळी त्याने त्या ठिकाणचे व्हिडीओ शुटींग काढून फिर्यादी यांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले.

तसेच फोन कॉल रेकॉर्डींग पाठवून फिर्यादी यांच्या वरिष्ठांकडे फिर्य़ादी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले.
याबाबत फिर्यादी यांनी संजीव कटके याला दुसऱ्या दिवशी जाब विचारला.
त्यावेळी कटके याने कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ग्रुपला टाकण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादी यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तुम्ही कुठे-कुठे जाता काय करता
या बाबत ग्रुपवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed