Mahavikas Aghadi-Shivsena UBT | महापालिका डोळ्यासमोर ठेऊन ठाकरे गटाचा मुंबईतील जागांवर दावा; मविआत जागावाटपाची तयारी
मुंबई : Mahavikas Aghadi-Shivsena UBT | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मविआ ला मोठे यश मिळाले. त्यामुळे मविआ चा आत्मविश्वास वाढलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी ९०-९५ जागा लढणार असल्याची माहिती आहे. मात्र त्या जागा कोणत्या असणार त्यावरून वादंग निर्माण होऊ शकतो. ठाकरे गटाला मुंबई, कोकण, राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे.
अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. यापैकी महत्वाचा असलेला मुंबई भाग शिवसेनाला हवा आहे. मागील दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. यामध्ये मुंबईतील बहुतांश जागा ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्याची साधक बाधक चर्चा झाल्याचे समजते आहे.
२०१९ मध्ये काँग्रेसचे चार आमदार आले होते. त्यापैकी वर्षा गायकवाड आता खासदार आहेत. तर राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आला होता. हा आमदार आता महायुतीसोबत (Mahayuti) आहे. यामुळे इथेही काही प्रमाणात तडजोड होण्याची शक्यता आहे. लोकसभेचे यश पाहता ठाकरे गट महापालिका निवडणुकीची बालेकिल्ल्यातील तयारी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीशी उर्वरित राज्यातील जागांवर तडजोड करून मुंबईत जादाच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. (Mahavikas Aghadi-Shivsena UBT)
विधानसभेच्या ज्या जागांवर जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस यात नसल्याने व मुंबईत एकतर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व असल्याने आता ठाकरे मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी काँग्रेसला किती जागा सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी २५ ते २८ जागा लढवण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
भाजपसोबत मैत्री असताना ठाकरे शिवसेनेने गेल्यावेळी १४ जागा जिंकल्या होत्या.
यापैकी आठ आमदार आता ठाकरेंसोबत तर सहा आमदार शिंदेंसोबत आहेत.
यापैकी एक आमदार आता खासदार झाले आहेत.
यामुळे दोन्ही गटाकडून या जागांवर नव्या उमेदवारांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई (Varun Sardesai) , दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar)
यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (BMC Election)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…