Pune BJP | विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Pune BJP

पुणे : Pune BJP | पुणे शहरात तसेच राज्यातील इतर भागात अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे (Harshada Pharande) यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महिला मोर्चा, पुणे शहराच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर केले. यात प्रामुख्यानेः

  1. शहरातील सर्व शाळा चालकांची तातडीने बैठक घेऊन त्यांना विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सक्त सूचना द्याव्यात.
  2. सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे Police Verification व चारित्र्य पडताळणी करण्यात यावी.
  3. सर्व शाळांमधील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.
  4. सर्व शाळांमध्ये पूर्ण वेळ महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत.
  5. आपल्या दामिनी पथकाचा प्रभावी वापर करुन त्यांच्या मदतीने या पद्धतीचे गुन्हे रोखता येतील का? याबाबत देखील सखोल विचार व्हावा.

आदी मागण्यांचा समावेश होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील याबाबत अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाकडून निश्चितपणे काम केले जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे. पुणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे देखील या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पुण्यातील पक्षाचे १०० माजी नगरसेवक त्यांच्या प्रभागामध्ये कार्यक्रम घेतील. त्यासोबतच येत्या २९ ऑगस्टला शहर स्तरावर कार्यक्रम घेतला जाईल. यामध्ये सर्व संस्थाचालक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी होतील. यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त या सर्वांना मार्गदर्शन करतील. (Pune BJP)

या शिष्टमंडळात भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांच्यासह भाजपा पुणे शहर सरचिटणीस वर्षा तापकीर, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Manjushree Khardekar), महिला मोर्चा सरचिटणीस शामा जाधव, उज्वला गौड, गायत्री खडके, प्रियांका शेंडगे, स्वाती मोहोळ, खुशी लाटे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या