Market Yard Pune Crime News | खुल्या कारागृहातून पळालेला जन्मठेपेचा कैदी मार्केटयार्डला जेरबंद; महिला अंमलदारांनी पाठलाग करुन पकडले

Arrest

पुणे : Market Yard Pune Crime News | चांगल्या वर्तवणुकीमुळे खुल्या कारागृहात ठेवण्यात आलेला जन्मठेपेचा कैदी पळून गेला होता. त्याला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील (Market Yard Police Station) महिला अंमलदारांनी पाठलाग करुन पकडले.

राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, रा. महालगाव ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या कैद्याचे नाव आहे. खुल्या कारागृहात काहीसा खुल्या वातावरणात तो आला असला तरी काही दिवसातच रोजच्या त्याच त्या रुटिनला तो कंटाळला होता. संधी मिळताच त्याने धुम ठोकली होती.

राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून (Warje Malwadi Murder Case) प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्याला सत्र न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुल्या कारागृहात (Yerawada Jail) रवानगी करण्यात आली होती. १९ ऑगस्ट रोजी तो नजर चुकवून पळून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता.

भारत बंदच्या अनुशंगाने २१ ऑगस्ट रोजी बंदोबस्त लावला होता. महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे हे मार्केटयार्डमधील शिवनेरी रोड ते वखार महामंडळ रोड अशी पायी पेट्रोलिंग करत होते. माकेटयार्ड गेट नं. १ जवळील रिक्षाजवळ एक व्यक्ती संशयितरित्या उभा असलेला दिसून आला. महिला अंमलदार वेदपाठक यांना राजू दुसाने कारागृहातून पळून गेल्याचा मेसेज व्हॉटसअपवर मिळाला होता. त्यावरील फोटोमधील मिळत्या जुळत्या वर्णनाची व्यक्ती ती दिसत होती. त्यामुळे त्यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला नाव पत्ता विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांना घाबरुन तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या सहकार्‍यांच्या मदतीने थोड्याच अंतरावर त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपले नाव राजू पंढरीनाथ दुसाने असे सांगितले. येरवडा पोलीस ठाण्यात फोन करुन खात्री करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

येरवडा कारागृहातील खुल्या कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली असली
तरी तेथील रोजच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळला असल्याने आपण पळून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा,
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे
यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे यांनी केली आहे. (Market Yard Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed