Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | अगरवाल पतीपत्नीसह डॉक्टरांचा जामीन फेटाळला ! रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण, कल्याणीनगर अपघात

Kalyani Nagar Car Accident Pune

पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट (Blood Sample Tampering Case Pune) केल्याप्रकरणात अगरवाल पती -पत्नीसह (Agrawal Husband-Wife) डॉक्टरांचे जामीन अर्ज (Bail Rejected) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यु. एम. मुधोळकर (Judge U. M. Mudholkar) यांनी फेटाळून लावले.

बांधकाम व्यावसायिक आणि मुलाचे वडिल विशाल सुरेंद्रकुार अगरवाल (Vishal Surendrakumar Agrawal), आई शिवानी विशाल अगरवाल Shivani Vishal Agrawal (दोघे रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससून न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor), अश्पाक मकानदार (Ashpak Makandar) आणि अमर गायकवाड (Amar Gaikwad) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात (Yerawada Jail) आहेत. आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल झाल्याने त्यांनी जामीन अर्ज केला होता.

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे (Adv Shishir Hiray) यांनी या जामीन अर्जाला विरोध केला.
आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेडछाड केली.
त्याचबरोबर नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाला योग्य निर्णय देण्यासाठी कायद्यानुसार पुरावा लागतो.
त्यांनी पुराव्याशी छेडछाड करुन न्याययंत्रणेशीच केलेला हा खेळ आहे. न्याययंत्रणेशी खेळणे हे अतिशय गंभीरपणे घेतले पाहिजे, असा युक्तीवाद अ‍ॅड. शिशिर हिरे यांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरुन सर्वांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. (Kalyani Nagar Porsche Car Accident Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed