Kagal Assembly Constituency | ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ म्हणत समरजितसिंह शरद पवार गटात प्रवेश करणार

Samarjit Ghatge-Hasan Mushrif

ऑनलाइन टीम – Kagal Assembly Constituency | कागलमध्ये पुन्हा स्वराज्य निर्माण करायचंय असे सांगून भारतीय जनता पार्टीचे नेते (BJP Leader) समरजितसिंह घाटगे (Samarjeet Sinh Ghatge) यांनी पक्षाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fandanvis) यांनी मोठा धक्का दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँगेस पक्षात (शरद पवार गट) Sharad Pawar NCP प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरच्या राजकीय क्षेत्रात (Kolhapur Politics) एकच खळबळ माजली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे समरजितसिंह घाटगे कागल मतदारसंघातून गेल्या दहा वर्षांपासून भाजपाच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी करत होते. असे असताना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या घाटगे यांनी भाजपाचा राजीनामा दिला. शुक्रवारी त्यांनी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून त्यांचे मत जाणून घेतले.

घाटगे म्हणाले की, “कागलमध्ये पुन्हा स्वराज्य निर्माण करायचे आहे. त्यासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते घेतले जातील. मी फडणवीस यांना भेटून आलोय. माझ्यात घाडस आहे त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागेल, हे सांगून आलोय. अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? हे मी कार्यकर्त्यांना विचारत आहे. आईसाहेब म्हणतात, तुम्हाला जिंकायचं असेल तर तुतारी घ्या. कागलमधील लोक देखील हेच सांगत आहे. त्यामुळे कागलच्या विकासासाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. “

दरम्यान मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. घाटगे यांनी कार्यकर्त्यांना तीन प्रश्न विचारले.
निवडणूक लढवायची का? अपक्ष की तुतारी चिन्हावर लढवायची? आत्ताच तुतारी हाती घ्यायची का? यावर कार्यकर्त्यांनी राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी म्हणत शरद पवार गटात प्रवेश करण्याची विनंती केली. त्यामुळे आता आजच जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा प्रवेश होईल असे सांगण्यात येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव