Yerawada Pune Crime News | पीएमपी बसमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड ! टोळभैरवांचा धिंगाणा, महिला बस कंडक्टरला शिवीगाळ, वयस्कराला मारहाण

Molestation-Case

पुणे : Yerawada Pune Crime News | कॉलेजमधून पीएमपी बसने घरी जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणींना दोघा टोळभैरवाने त्यांच्या अंगाला स्पर्श करुन, मिठी मारुन विनयभंग केला (Molestation Case). त्याला विरोध करणार्‍या महिला कंडक्टरला शिवीगाळ करुन एका वयस्कर नागरिकाला हाताने मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे टोळभैरव अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. (Yerawada Pune Crime News)

याबाबत एका मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार इराणी मार्केट बसस्टॉपपासून ते फायनान्स चौक बसस्टॉपपर्यंत बस क्रमांक ३१५ मध्ये शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पाऊण वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी तिची मैत्रिण या दोघी कॉलेज सुटल्यावर पुणे स्टेशन ते आळंदी या बस क्रमांक ३१५ ने घरी येत होत्या. बसमध्ये दोन टोळभैरव चढले. त्यांनी फिर्यादीच्या मुलीच्या अंगाला नको तेथे स्पर्श केला. तिच्या मैत्रिणीच्या कमरेला मिठी मारली. वाडिया कॉलेजमधील शिकणार्‍या एका मुलीलाही त्यांनी भर बसमध्ये मिठी मारली. नागपूर चाळ बसस्टॉपवर बस थांबविल्यावर या मुलीने बसमधून उतरुन रस्त्यावरील दगड उचलून घेऊन त्यांना मारला. तेव्हा त्यांनी बसमधून उतरुन जाताना आम्ही आमच्या ग्रुपला घेऊन येऊन दाखवितो, अशी धमकी दिली. त्यांना विरोध करणार्‍या महिला कंडक्टरला शिवीगाळ केली.

बसमध्ये असणार्‍या एका वयस्कर नागरिकाला हाताने मारहाण केली.
या मुलींनी घरी आल्यावर याची माहिती आपल्या आईला दिल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव
घेत फिर्याद दिली आहे. याची माहिती मिळाल्यावर
वरिष्ट पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke),
सहायक पोलीस निरीक्षक सोळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली
असून या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही या २ टोळभैरवांचा पत्ता अद्याप लागला नसून
ते मोकाट आहे. सहायक पोलीस निरीक्षक देवकर-पाटील तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव

You may have missed