Rohit Pawar On Ajit Pawar NCP | ‘सध्या राज्यात गुलाबी गँग फिरत आहे’; रोहित पवार यांचा टोला
पुणेरी आवाज – Rohit Pawar On Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) नेते आमदार रोहित पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर (Jan Sanman Yatra) जोरदार टोलेबाजी करत म्हंटले की, उपमुख्यमंत्री पवार यांच्या यात्रेचा रंग गुलाबी आहे. हा गुलाबी रंगाचा धागा पकडत, सध्या राज्यात गुलागी गँग फिरत आहे.
इंदापूरमधील सोनाई प्रतिष्ठानच्या (Sonai Pratishthan Indapur) वतीने सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil), आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap), उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar), प्रदिप गारटकर (Pradeep Garatkar), मेहबूब शेख (Mahebub Shaikh), आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale), सोनाई प्रतिष्ठानचे प्रमुख दशरथ माने (Dashrath Mane) आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा रंग गुलाबी आहे. हा गुलाबी रंगाचा धागा पकडत, सध्या राज्यात गुलाबी गँग फिरत असून, महिलांना दमदाटी करत पैसे देऊन गर्दी जमवली जात आहे. हे आता लोकांना समजायला लागले आहे. त्यामुळे वातावरण बदलत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या ‘ लाडकी बहीण योजने’ (Ladki Bahin Yojana)
वरून टिका करत म्हटले की, कोणत ही नातं पंधराशे रूपयांना विकत घ्यायचं नसतं.
राज्यात सध्याची परिस्थिती पाहता ‘ हवा बदल रही है’ असंच चित्र दिसत आहे.
त्यामुळं स्टेजवर आता नसलेले देखील आपल्या बरोबर येतील. असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला.
सोनाई प्रतिष्ठान द्वारे अत्यंत सुत्य उपक्रम राबवले जात असतात. माने आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांनपासूनचे ऋणानुबंध आहेत. निवडणुका येतात आणि जातात. त्यात फार अडकायचे नसते. नाती जपायची असतात. असं ही सुळे म्हणाल्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा