Sharad Pawar | शरद पवारांनी उपस्थितांना घ्यायला लावली शपथ ! भर पावसात केले आंदोलन
पुणेरी आवाज – Sharad Pawar | बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या (Badlapur School Girl Incident) निषेधार्थ शनिवारी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पुणे रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंदोलन केले. यावेळी भर पावसात शरद पवार यांनी उपस्थितांना महिलांवर कधी ही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही. अशा आशयाची एक शपथ घ्यायला लावली. (Sharad Pawar)
पाऊस पडत असून देखील शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आंदोलन सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. शरद पवार म्हणाले की, बदलापूरमधील घटना दुर्दैवी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हात कापण्याची शिक्षा दिली तशी या प्रकरणाची गांभीर्याने दखल सरकारने घ्यावी. एक दु:ख वाटतं की, सरकार म्हणतयं की आम्ही या विषयावर राजकारण करतोय. पण पीडितेबाबत बोलणं योग्य नाही का? राज्यात एक दिवस असा जात नाही, ज्यात कुठे तरी भगिनींवर अत्याचार झाल्याची बातमी येत नाही. जे काही घडत आहे त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहीजे. असं ही पवार म्हणाले.
असंवेदनशील सरकार
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात वर्दीची भीतीच राहिलेली नाही. बदलापूर सारख्या अनेक घटना राज्यात होत आहेत. घटनेच्या विरोधात आंदोलन केले तर असंवेदनशील सरकार म्हणतयं की आंदोलनकर्ते बाहेरचे होते. माध्यमांनी स्पष्ट केले आहे की, आंदोलक स्थानिकच होते. म्हणजे सरकारच या घटनेवर गलिच्छ राजकारण करत आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो. असं ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा