Katraj Pune Crime News | पेट्रोलपंपावरील कामगाराने १ लाख ७० हजारांची रोकड लांबविली; शहीद कर्नल प्रकाश पाटील पेट्रोल पंपावरील घटना
पुणे : Katraj Pune Crime News | पेट्रोल पंपावर जमा होणारी कॅश ठेवण्यास दिली असता तेथील कामगार ही १ लाख ७० हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेला. (Robbery On Petrol Pump Pune)
याबाबत सुवर्णा प्रकाश पाटील (वय ५५, रा. शालिनी बंगला, निगडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सतीश बाबुराव होके Satish Baburao Hake (वय ३५, रा. आंबेगाव पठार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज देहुरोड बायपास रोडवरील (Katraj Dehu Road Bypass) आंबेगाव येथील शहीद कर्नल प्रकाश पाटील पेट्रोल पंपावर (Shahid Lt Col Prakash Patil Petrol Pump) ३ जून २०२४ रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने शहीद झालेल्या कुटुंबांना पेट्रोल पंपाचे वाटप केले आहे. त्यात कात्रज देहुरोड बायपास रोडवरील आंबेगाव येथे शहीद कर्नल प्रकाश पाटील यांच्या कुटुंबाला हा पेट्रोल पंप मिळाला आहे. फिर्यादी या त्यांचे नातेवाईकांच्या लग्नासाठी सांगली येथे गेल्या होत्या. (Katraj Pune Crime News)
पेट्रोल पंपावर काम करणारा कामगार सतीश होके याला
पेट्रोल पंपावरील कॅश जमा करण्यासाठी ठेवले होते. त्या पेट्रोल पंपावर
नसल्याचा फायदा घेऊन त्याने ३ जून रोजी जमा झालेली १ लाख ७० हजार ८०० रुपये घेऊन
तो पळून गेला आहे. पोलीस उपनिरीक्षक मिठारे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा