Raj Thackeray On Ladki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण योजनेचा आणखी एखादा हप्ता मिळेल, पुढे काय?’ राज ठाकरेंचा सवाल, म्हणाले – “हातात सत्ता दिली की दाखवेन सरकार कसं चालतं…”
नागपूर : Raj Thackeray On Ladki Bahin Yojana | मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, लोकांना तुम्ही कामाला लावा. लोक काम मागत आहेत. फुकटचे पैसे मागत नाहीत, शेतकरी फुकटची वीज मागत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा लोकांच्या मागण्या समजून तर घ्या. मला वाटतंय आता पहिला महिना जाईल, दुसरा महिनाही कदाचित जाईल. सरकारकडे पैसे कुठे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. ‘याच्यामध्ये अजितदादांनी सांगितले आहे का निवडून दिलं तरच पुढचं, तसं होणार नाही ते. सरकारकडे पैसे तर पाहिजेत?’, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज्यातील जनतेने ४८ तासांचा अवधी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्राला गुन्हेगार मुक्त करू, राज ठाकरेंच्या हातात सत्ता दिली की दाखवेन सरकार कसं चालतं?कायद्याचा धाक म्हणजे काय हे मी दाखवून देईन. यानंतर महाराष्ट्रात कोणीही स्त्रीकडे घाणेरड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी मते मिळणार नाहीत, दलित आणि मुस्लिमांच्या मोठ्या वर्गाने भाजपच्या विरोधात मतदान केले. ही मते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या विरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडे गेली. ही मते महाविकास आघाडीची नव्हती. ही लाट आता संपली आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली.
आज जो काही राज्यात राजकीय चिखल झाला आहे त्याला शरद पवार हेच जबाबादार असल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.
पुलोदची स्थापना झाली तेव्हापासूनच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मसुद्धा फोडाफोडीतूनच झाला. जातीपातीचे विषही त्यांनीच कालवले.
आता हाच कित्ता सर्वच राजकीय पक्ष गिरवीत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Ladki Bahin Yojana)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय